You are currently viewing मैदानी स्पर्धांमध्ये रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

मैदानी स्पर्धांमध्ये रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

मालवण

मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये बाजी मारत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी खेळाडू- विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये ४०० मीटर रनिंग मध्ये आदेश हाके याने प्रथम क्रमांक पटकावला. तर ८०० मीटर रनिंग मध्ये शंकर पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला. ३ किलोमीटर रनिंग यामध्ये विवेक पाटील याने प्रथम तर शिवम पासले याने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ४०० मीटर रिले मध्ये मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. यामध्ये क्षितिजा खरवते, रेश्मा पांढरे, दर्शना भिसे, अनुष्का म्हापणकर या सहभागी झाल्या होत्या.

या सत्कार प्रसंगी प्राचार्य. डॉ. एस. ए. ठाकूर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. हसन खान, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. धामापूरकर, प्रा. गावडे, प्रा. खरात, प्रा. संकेत बेळेकर, प्रा. मेस्त्री व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा