You are currently viewing शिरोडा बाजारपेठ मधील मनसेच्या आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद…

शिरोडा बाजारपेठ मधील मनसेच्या आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद…

शिरोडा

मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ला मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबीरा उद्धाटन श्री. रमेश पणदूरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी 95 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी डॉ.रघुनाथ गावडे मुंबई/कणकवली, डॉ. आनंद तावडे, टेक्निशियन प्रथमेश घाडगे, फार्मशिस्ट आदित्य कुटे, फिजिओथेरिपीस्ट उमेश नवशे, आरवली सोन्सुरा नर्स दीपश्री चिपकर यांच्या टीमने तपासणी केली. यावेळी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सनी बागकर, तालुका सचिव आबा चिपकर, उप तालुकाध्यक्ष विनायक फटनाईक, शहरं अध्यक्ष प्राजेश गावडे, विभाग अध्यक्ष योगेश शेट्ये, शाखा अध्यक्ष टाकं सहदेव फोडनाईक, शाखा अध्यक्ष आरवली गंगाराम मातोंडकर, दाजी शेट्ये, अभिजीत पणदूरकर , बाबा निखारगे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

प्रतिक्रिया व्यक्त करा