You are currently viewing कुडाळात न.प. निवडणुकीत प्रभाग १६ मध्ये भाजपचा मनसेला पाठिंबा

कुडाळात न.प. निवडणुकीत प्रभाग १६ मध्ये भाजपचा मनसेला पाठिंबा

भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची संयुक्त पत्रकार परिषद

कुडाळ

कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन झाल्याने या प्रभागात भाजप पक्षाचा उमेदवार असणार नाही मात्र या प्रभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सहदेव उर्फ बाळा पावसकर यांना भाजप पाठिंबा देत असल्याचे भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तसेच नगरपंचायतीच्या उर्वरित जागांवर रिंगणात असलेल्या भाजपच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असेल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

कुडाळ येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, आनंद शिरवलकर शहर अध्यक्ष राकेश कांदे, प्रशांत राणे प्रज्ञा राणे मनसेचे बाबल गावडे, दीपक गावडे, राजेश टंगसाळी आदी उपस्थित होते
या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई यांनी सांगितले की, कुडाळमध्ये भाजप व मनसे ही युती नव्याने होत नाही तर यापूर्वी पिंगुळी ग्रामपंचायत आणि कुडाळ पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून युती करण्यात आली होती आणि हा पॅटर्न आता कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राबविण्यात येणार आहे प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर या प्रभागांमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होणार आहे याठिकाणी भाजपचा उमेदवार असणार नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सहदेव पावसकर यांना भाजपचा पूर्णपणे पाठिंबा असणार असून त्यांच्या प्रचारामध्ये भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होणार आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले ही झालेली स्थानिक पातळीवरची होती वरिष्ठ नेत्यांना विचारून करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सांगितले की, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर प्रभागांमध्ये जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारामध्ये असणार आहे तसेच प्रभाग १६ मधील उमेदवार सहदेव पावसकर हे निवडून आल्यानंतर भाजप जो गट स्थापन करेल त्या गटात ते सामील होणार आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 10 =