You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव च्या विद्यार्थ्यांची ज्युदो कराटे स्पर्धेत उज्वल कामगिरी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव च्या विद्यार्थ्यांची ज्युदो कराटे स्पर्धेत उज्वल कामगिरी

सावंतवाडी

संजू परब मित्र मंडळ सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो  कराटे आकिदो असोसिएशन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 43 वा वर्धापन दिना निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य ज्युदो स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव च्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले.

कु. आराध्य नाटेकर सुवर्ण पदक कु. अस्मि तेंडुलकर, कु. मनवा साळगावकर रौप्य पदक, कु. वैष्णव सावंत, देवांश यादव व सोहम देशमुख यांनी कास्यपदक मिळवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांना दिनेश जाधव सरांनी प्रशिक्षण दिले तर रुजूल पाटणकर सरांनी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने खूप अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा