You are currently viewing कणकवलीत ‘सुशासन दिवस’ साजरा, प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण

कणकवलीत ‘सुशासन दिवस’ साजरा, प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण

आम. नितेश राणे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकऱ्यांसोबत सहभागी

कणकवली

भाजपा आमदार नितेश राणे यांनी शेतकरी, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समवेत कणकवलीत ‘सुशासन दिवस’ कार्यक्रम साजरा केला.यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करून या कार्यक्रमात सहभागी झालेत.यावेळी भारत रत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

देशात भारत रत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म दिवस ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.तसाच कणकवलीत सुद्धा साजरा करण्यात आला. या सुशासन दिनाच्या शुभ मुहुर्तावर शेतकरी व गरीबांच्या कल्याणाकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएमकिसान योजनेतून ९ करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८ हजार करोड रुपये जमा केले.यावेळी जनतेला प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कणकवली येथे करण्यात आले होते.

यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सोबत भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री,कणकवली सभापती दिलीप तळेकर,नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण,राजन चिके,शहर अध्यक्ष अण्णा कोदे,महिला उपाध्यक्ष सौ.सदडेकर,बुलंद पटेल,सुहास सावंत,बाबासाहेब वर्देकर,पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांच्यासह ग्रामीण भागातील शेतकरी, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 17 =