You are currently viewing २१ नोव्हेंबर रोजी तळवडे येथे खुल्या ग्रुप व सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन

२१ नोव्हेंबर रोजी तळवडे येथे खुल्या ग्रुप व सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी :

तळवडे येथे २१ नोव्हेंबरला म्हाळाई देवी कला क्रीडा मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने दिवाळीनिमित्त खुल्या ग्रुप डान्स व सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रात्री ८ वाजता श्री म्हाळाईदेवी विद्यामंदिर शाळा नं.९ तळवडे-म्हाळाईवाडी येथे होणार आहे. यात ग्रुप डान्स साठी प्रवेश फी ४०० व सोलो डान्स साठी प्रवेश फी २०० रुपये ठेवण्यात आली आहे.

या स्पर्धेत ग्रुप डान्स साठी प्रथम पारितोषिक ७०००, द्वितीय ५०००, तृतीया ३००० व उत्तेजनार्थ १००० ठेवण्यात आले असून सोलो डान्स साठी प्रथम पारितोषिक ५०००, द्वितीय ३०००, तृतीया १५०० व उत्तेजनार्थ ५०० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. नोंदणीची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असून स्पर्धेचे ठिकाण श्री म्हाळाईदेवी विद्यामंदिर शाळा नं.९ तळवडे-म्हाळाईवाडी येथे होणार आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महेश लोके ९५५२०४६३८७, संजय आचरेकर ९४२२५४५४३८, सुशांत गावडे ९४२३९४२२६०, कृष्णकांत मालवणकर ९८५०१०४८६०, श्याम हरमलकर ८६००४३००२९ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा