You are currently viewing अनंतराव भिडे प्राथमिक विद्या मंदिरची स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी निवड

अनंतराव भिडे प्राथमिक विद्या मंदिरची स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी निवड

मुख्याध्यापिका सौ.सुनिता केटकाळे यांची माहिती

इचलकरंजी / प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या शिक्षण मंञालयामार्फत स्वच्छ भारत – स्वच्छ विद्यालय अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छ विद्यालय स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये जिल्हास्तरावर इचलकरंजी शहरातील डिकेटीई संस्थेचे अनंतराव भिडे प्राथमिक विद्या मंदिर अव्वल ठरले.त्यामुळे या विद्यालयाची स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती
मुख्याध्यापिका सौ.सुनिता केटकाळे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून यंदाच्या वर्षी स्वच्छ विद्यालय स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत खासगी प्राथमिक शाळेतून डिकेटीई संस्थेचे अनंतराव भिडे
प्राथमिक विद्या मंदिर सर्व निकषास पाञ ठरुन अव्वल ठरले.त्यामुळे या विद्यालयाची स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
लवकरच एका शानदार समारंभात या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अनंतराव भिडे
प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता केटकाळे यांनी दिली.तसेच
जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय स्पर्धेत यश साध्य करण्यासाठी अनंतराव भिडे प्राथमिक विद्या मंदिरास डिकेटीई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे , उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे,सचिव सौ.सपना आवाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे देखील सांगितले.दरम्यान ,
जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय स्पर्धेत उठावदार कामगिरी करण्यासाठी अनंतराव भिडे
प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता केटकाळे यांचे प्रोत्साहन व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे चांगले सहकार्य लाभले.या पुरस्काराबद्दल सदर विद्या मंदिरचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =