*आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.नाम.डॉ.रामदास आठवले उद्या 20 मे 2026 रोजी गोवा दौऱ्यावर*
आर.पी.आय.चे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव -रमाकांत जाधव यांनी दिली माहिती.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री -नाम.डॉ.रामदास आठवले हे उद्या बुधवार दि.20 मे 2026 रोजी गोवा दौऱ्यावर येत असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव यांनी दिली.
उद्या सकाळी 10 वाजता मोपा,पेडणे गोवा विमानतळावर ना.डॉ.आठवले यांचे आगमन व स्वागत होणार आहे.त्यानंतर गोव्यात विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत,कार्यकर्त्यांची पणजीत बैठक होणार आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष-अजितकुमार कदम, जिल्हा संघटक- ॲड.एस.के.चेंदवणकर,जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे,जिल्हा खजिनदार-आनंद पेंडूरकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका-सौ.ज्योती रमाकांत जाधव,जिल्हा उपाध्यक्षा-सौ.जागृती सासोलकर,जिल्हा सरचिटणीस-सौ.निताली कांबळे,सहसचिव- सौ.प्रगती कांबळे,जिल्हा खजिनदार-सौ.समिधा निगुडकर यांनी केले आहे.
