You are currently viewing नायट्रोजन सिलेंडरच्या किटचा वापर करून युवकाची आत्महत्या

नायट्रोजन सिलेंडरच्या किटचा वापर करून युवकाची आत्महत्या

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरातील माठेवाडा परिसरात राहणाऱ्या जेसन फर्नांडीस नामक युवकाने आत्महत्या केली आहे. बाथरूममध्ये नायट्रोजन सिलेंडरच्या किटचा वापर करून तोंडाला पिशवी बांधत आत्महत्या केली. गॅसमूळे श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सुरुवातीला या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा तर्क पोलिसांनी व्यक्त केला होता. तसेच त्याने दरवाज्यावर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत विषारी द्रव्याचा वापर केला आहे त्यामुळे आत येऊ नका, असे म्हटल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने काळजी घेत बाथरूम वरील कौले काढून आत मध्ये प्रवेश केला.

मात्र, यावेळी पोलिसांना वेगळेच दृश्य समोर दिसून आले. संबंधित युवकाने नायट्रोजन सिलेंडरचा टँक बाथरूम मध्ये नेऊन त्याची पिशवी आपल्या तोंडावर बांधून स्वतःला कोंडून घेतले. मात्र त्याने असा अजब प्रकार का वापरला असावा याबाबत आता तर्क वितर्क केले जात आहेत. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा