You are currently viewing संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात १८१ दात्यांचे रक्तदान

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात १८१ दात्यांचे रक्तदान

कणकवली

शिवसेना नेते तथा कोकण विकास समितीचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिनी व कै. सुबोध टिकले यांच्या स्मृती दिनानिमित्त येथील मातोश्री मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजन केले होते. यात १८१ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटन माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते झाले.
यावेळी आम वैभव नाईक,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे,बाळा भिसे,सौ.समृद्धी पारकर,देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष सौ.सावंत नगरसेविका हर्षदा ठाकूर सुमेधा अंधारी,माजी जी.प.सदस्य संजय आंग्रे,रुपेश पावसकर,सुदाम तेली,शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये,तालुका प्रमुख शैलेश भोगले,मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,शहर प्रमुख शेखर राणे,अपर्णा कोठावळे,प्रसाद अंधारी,अवधूत मालणकर,अनुज्ञा मालवणकर,सुनील काकडे,आदिनाथढमाले,अँड.हर्षद गावडे,नगरसवेक रुपेश नार्वेकर,कन्हैया पारकर आदी उपस्थित होते. उपस्थित होते.
संदेश पारकर हे आपला वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात. आपल्या वाढदिनी कै सुबोध टिकले यांच्या स्मृती दिनी गेली कित्येक वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करीत आहेत. या शिबिरात रक्तदाते उत्सुर्पपणे रक्तदान करत असतात. त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा