You are currently viewing कवी गीतकार गझलकार सदानंद डबीर यांच्या हस्ते दर्याचा राजा दिवाळी अंक 2022 विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

कवी गीतकार गझलकार सदानंद डबीर यांच्या हस्ते दर्याचा राजा दिवाळी अंक 2022 विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

कवी गीतकार गझलकार सदानंद डबीर यांच्या हस्ते दर्याचा राजा दिवाळी अंक 2022 विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

मुंबई

आजचा दिवस आणि हा कार्यक्रम *दर्याचा राजा* दिवाळी अंकाचे प्रकाशन अत्यंत विशेष आणि खास आहे. आपल्या आवडी निवडी जपत गेल्या 15 वर्षांच्या प्रवासात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेती, मनोरंजन, क्रीडा थोडक्यात आपल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण लेखन आपल्यापर्यंत दर्याचा राजाने वेळोवेळी पोहोचवले. दिवाळी अंकाच्या लेखन-वाचन संस्कृतीचे पाईक होत, दर्याचा राजाचा हा दिवाळी अंक प्रेक्षकांच्या वाचकांच्या हाती ठेवत दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेच्या प्रवाहात ही छोटीशी ओंजळ वाहण्याच्या प्रयत्नाचं महाराष्ट्र नक्की स्वागत करेल ,याचा मला विश्वास वाटतो . दर्याचा राजा दिवाळी अंक एक आदर्श अंक आहे. या अंकात मधु मंगेश कर्णिक , डॉ. विजया वाड उषा मेहता, रत्नकर मतकरी या *मान्यवरांच्या* *साहित्या* *बरोबर नवोदितांचे असे शंभर लेखक कवींचे दिवाळी साहित्य संमेलन भरून वाचकांना* साहित्य फराळ पुरविले आहे.
या दिवाळी अंकाचे मी मनापासून स्वागत व अभिनंदन करतो *असे गौरवोदगार सुप्रसिद्ध कवी गीतकार, गझलकार सदानंद डबीर यांनी दर्याचा राजा* *दिवाळी अंक २०२२* *विशेषांकाचे प्रकाशन करताना काढले*

*प्रारंभी दर्याचा राजाचे संपादक श्री. पंढरीनाथ तामोरे यांनी शाल श्रीफळ आणि पुष्प करंडक* *देऊन सदानंद डबीर यांचा यथोचित सत्कार केला* *आणि पंधरा वर्षाच्या दर्याचा राजाचे यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला*
*सदर प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्र राज्य माजी मत्स्य आयुक्त विनोद नाईक, कवी वसंत तांडेल, समाजसेवक* *जयवंत गावडे, सहसंपादक प्रवीण वैद्य, मांगेला समाज माहीमगाव शाखा अध्यक्ष* *अविनाश तांडेल, महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे* “कार्यवाह अँड. सुनील शिर्के* *यांनी दर्याचा राजाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या*
*याप्रसंगी सदानंद डबीर यांच्या पत्नी सौ मृण्मयी सदानंद डबीर, समाजसेवक प्रकाश धनु* *फोटोग्राफर रामदास तांडेल उपस्थित होते कार्यकारी संपादक जनार्दन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले*
*सदानंद डबीर यांनी गायलेल्या गीत गझल कार्यक्रमाने प्रकाशन समारंभास एक वेगळीच उंची लाभल्याने टाळांच्या कडकडात कार्यक्रमाची सांगता झाली*

 

Advertisement

_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃‍♀️🏃‍♂️

*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*

_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_

*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*

*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*

*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*

*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*

*_👩🏻‍🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*

*_👨🏻‍🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*

*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*

*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*

_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_

*📲9763824245 /9420196031*

*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + five =