You are currently viewing पवित्र प्रणालीतील उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे, बदल करण्यासाठी 17 जुलै पर्यंत मुदतवाढ

पवित्र प्रणालीतील उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे, बदल करण्यासाठी 17 जुलै पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

 सन 2017 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी दिलेल्या व पोर्टलवर नोंद केलेल्या सर्व उमेदवारांना नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे, बदल करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी दि. 17 जुलै 2022 रोजीपर्यंत मुदत असून यासाठी उमेदवारांनी https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. यामधून मुलाखतीशिवाय पद भरती प्रक्रियेत अनुदानित शाळेवर निवड होऊन रुजू झालेले उमेदवार वगळले असल्याची माहिती, महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी व डॉ. मुश्ताक शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

                प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडेलेल्या 561 व्यवस्थापनांच्या 2062 रिक्त पदांसाठी पोर्टलमार्फत दि. 2 स्पटेंबर 2021 रोजी पात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये SEBC प्रवर्गासाठी जागा होत्या तथापि खुल्या प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा 196 व्यवस्थापनांसाठी नव्याने प्राधान्यक्रम घेऊन पद भरतीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. काही उमेदवारांकडून गैरसमजुतीने वा चुकीने पोर्टलवर स्व प्रमाणपत्रात चुकीची, अपूर्ण माहिती भरलेली असल्यामुळे या माहितीमध्ये बदल करण्याची उमेदवारांकडून मागील 2 वर्षापासून सातत्याने होत असलेली विनंती लक्षात घेता अशा उमेदवारांना स्व प्रमाणपत्रात योग्य तो बदल करण्याची सुविधा दि. 24 सप्टेंबर 2021 पासून देण्यात आलेली होती. परंतु उमेदवारांचे स्व प्रमाणपत्र अपडेट झालेले नाहीत. ते आता नव्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर बाब विचारात घेता सन 2017 मध्ये शिक्षक  अभियोग्यता व बुद्दिमत्ता चाचणी दिलेल्या व पोर्टलवर नोंद केलेल्या सर्व उमेदवारंना ( मुलाखतीशिवाय पद भरती प्रक्रियेत अनुदानित शाळेवर निवड होऊन रुजू झालेले उमेदवार वगळून) नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे, बदल करणेबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दि. 17 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांनी https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. 196 व्यवस्थापनातील पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना स्व प्रमाणपत्र नव्याने पूर्ण करणे (self-certified) आवश्यक आहे. जे  उमेदवार नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत, त्यांचा 196 व्यवस्थापनातील पद भरतीसाठी विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

                स्व प्रमाणपत्रातील नोंद करण्याचा कालावधी संपल्यानंतर उमेदवारांकडून 196 व्यवस्थापनातील रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम घेण्यात येतील व उमेदरावांना दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन मुलाखतीसाठी गुणपत्तेनुसार पात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल. याबाबतच्या सूचना पोर्टलवर स्वतंत्रपणे देण्यात येतील. उमेदवारांना स्व प्रमाणपत्र अपडेट करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना पोर्टलवरील Information Brochure यामध्ये उपलब्ध आहेत. स्व प्रमाणपत्र अपडेट करताना येणाऱ्या अडचणी edupavitra@gmail.com या ई-मेलवर पाठवता येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =