You are currently viewing कल्याण येथे भव्य राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन..

कल्याण येथे भव्य राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन..

मुंबई / कल्याण :

मनस्पर्शी साहित्य परिवार यांचे वतीने रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी १ ल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन कल्याण येथील सिद्धीविनायक गार्डन हॉल, बिर्ला रोड, भोईरवाडी या ठिकाणी करण्यात आले आहे.

या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रतिभावान व नवोदीत साहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या साहित्याला नवी ओळख मिळावी या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे.

“मनस्पर्शी साहित्य परिवार” हा व्हॉट्सॅप समूह २४ जुलै २०१९ रोजी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केला आहे. गेली ३ वर्षे या समूहात लेखनाचे असंख्य उपक्रम राबवून साहित्यिकांच्या लेखणीला प्रोत्साहन देत मनस्पर्शी कार्यरत आहे.

या समूहात दररोज दैनंदिन उपक्रमाअंतर्गत वेगवेगळे विषय दिले जातात व त्यावर मुक्तपणे आवडत्या लेखन प्रकारातून व्यक्त होण्याची संधी मिळते. समूहातर्फे विविध विषयांवर वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजनही केले जाते. सुरुवातीला अगदी ३ सदस्यांपासून सुरू केलेला हा समूह आज जवळपास ५००० सदस्यांच्या संपर्कात आला आहे.

आजवरच्या ३ वर्षाच्या साहित्य सेवेत सक्रिय असताना या समूहाने २७ विशेष काव्य स्पर्धा, ५ लेख स्पर्धा, ३ कथा स्पर्धा, २ अलक स्पर्धा, १० ऑनलाईन काव्य संमेलन, एक गझल मुशायरा, आणि एक महास्पर्धा वेळोवेळी घेण्यात आल्या. यामधील विजेत्यांना रोख पारितोषिके व ऑनलाईना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे समूहाशी अनेक साहित्यिक जोडले गेले.

मनस्पर्शी साहित्य परिवाराचे भव्य राज्यस्तरीय काव्य संमेलन दि. ८ जानेवारी,२०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत चालणार आहे. या संमेलनाचे उद्घाटक – मा. दत्तात्रय शिंदे, स्वागताध्यक्ष कवयित्री मा. प्रा. मानसी जोशी, संमेलनाचे प्रमुख वक्ते आनंद लेले हे असून मुख्य संमेलनाध्यक्ष म्हणून मा. कवयित्री व लेखिका प्रा. प्रतिभा सराफ या लाभल्या आहेत. प्रमुख अतिथी मान्यवर कवयित्री मा. कल्पना गवरे, लेखिका मा. राधिका भांडारकर, मा. सौ. अस्मिता पंडित हे असून . मनस्पर्शीच्या मा. कु. मानसी पंडित तसेच मा. प्रा. विजय काकडे हे व्याख्याते संमेलनाचे महत्वाचे स्थान भूषविणार आहेत.

या संमेलनाचे सूत्रसंचालन मनस्पर्शी साहिय समुहाचे प्रशासक व युवा कवी मा. निखील कोलते व समूहाच्या अध्यक्षा मानसी ताई पंडित करणार आहेत. मनस्पर्शीच्या या संमेलनाला प्रायोजक म्हणून ठाणे येथील ‘तन्वी हर्बल्स’ तर्फे डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर त्याचबरोबर कल्याण मधील सुप्रसिद्ध बिल्डर श्री.उमेश बोरगावकर यांनी खूप मोलाचे सहकार्य करून संमेलनासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

संमेलन यशस्वी करण्यासाठी मा. निखील कोलते, मा. राजेश नागुलवार, मा. जयश्री चौधरी, मा. सौ मधुरा कर्वे, मा. सौ सोनाली जगताप, मा. जयश्री शेळके, मा. सौ संपदा देशपांडे, मा. आनंद लेले यांनी कार्यकारणीचे सदस्य आपले अमूल्य योगदान देत आहेत. पहिल्याच पण भव्य दिव्य कवी संमेलनात प्रथम नावनोंदणी करणाऱ्या एकूण ३५ निमंत्रित कवींना संधी देण्यात आली आहे. त्या प्रत्येक सहभागी सर्व कवींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

*मनस्पर्शी प्रशासक समिती :*

अध्यक्षा – मा. मानसी ताई पंडित (विलेपार्ले, मुंबई)

उपाध्यक्षा – मा. जयश्री ताई शेळके (बुलढाणा)

व्यवस्थापक. मा. निखिल प्रमोद कोलते (कल्याण)

सह संचालक व मार्गदर्शक. मा. राजेश नागुलवार ऊर्फ, राजमन (चंद्रपूर)

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + six =