You are currently viewing भाजपा किसान मोर्चा, सिंधुदुर्गच्या वतीने शेती पर्यटन

भाजपा किसान मोर्चा, सिंधुदुर्गच्या वतीने शेती पर्यटन

मालवण :

भाजपा किसान मोर्चा – सिंधुदुर्ग ने सामुदायिक शेती बरोबर शेती पर्यटन हा अभिनव उपक्रम सुरू केला. मालवण तालुक्यातील हडी गावात किसान मोर्चा मालवण च्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रयोग सफल झाला आहे. आता ग्रामीण भागात मजुर मिळणे अवघड झाल्याने दिवसेंदिवस शेती व्यवसाय कमी कमी होत आहे. त्यामुळे जमीनी ओसाड पडत आहेत. हे असे होऊ नये, तसेच परत शेतकऱ्यांनी शेतीकडे वळावे,त्याच्यात उत्साह निर्माण व्हावा, त्यांना सुद्धा वाटावे की आपण पण सामुदायिक शेती करावी. शेतीची भावना परत त्यांच्या मनात जागृत व्हावी या साठी किसान मोर्चाचे हे प्रयत्न आहे.

तसेच शेतीबरोबर शेतकरयांना पुरक असा व्यवसाय उभा करुन जास्तीत जास्त शेतकरी पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी “शेती पर्यटन” हा नाविन्यपूर्ण व्यवसाय किसान मोर्चा च्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

या माध्यमातून पर्यटकांना पण शेतावर आणून त्यांना शेतीचा आनंद घेता यावा.यातून शेतकऱ्याचे विना मोबदला काम होईल, उत्साह वाढेल. तसेच पर्यटकांना पण आपण स्वतः शेती केल्याचा आनंद मिळेल व आलेला पर्यटक सुद्धा त्याचा मोबदला त्या शेतकरयाला देईल व यातुन शेतकरयांना एक जोडधंदा मिळेल हा या मागचा किसान मोर्चा चा उद्देश असल्याचे जिल्हा संयोजक उमेश सावंत यांनी सांगितले.

या शेती पर्यटनाच्या पहील्याच उपक्रमात सुमेधा नाईक, नैना पोयेकर,अनुष्का गावडे, स्वाती पारकर, कविता तळेकर, दर्शन वेंगुर्लेकर इत्यादी शहरी पर्यटकांची ग्रामीण भागातील शेती करण्याचा आनंद लुटला .

यावेळी किसान मोर्चाचे हरिभाऊ केळुसकर, संजय मळेकर, किशोर नरे, प्रसाद भोजने, विष्णू नरे, मांजरेकर, सौ.मळेकर इत्यादी कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + twenty =