You are currently viewing चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावली सिंधुदूर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावली सिंधुदूर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सिंधुदुर्ग

गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस कोकणचं खुप मोठं नुकसान करून गेला. चिपळूण येथील अतिवृष्टीने झालेली परिस्थिती अतिशय भयावह अशी आहे. या नुकसानग्रस्तांना माणुसकीच्या नात्यातून मदतीचा हात देणं गरजेचं बनलं आहे. त्यामुळे आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरसावली आहे. पक्षाच्या माध्यमातून चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ या संकल्पना राबवली जातेय. या संकल्पनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तू भरून एक ट्रक चिपळूणकडे रवाना करण्यात आला. कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी झेंडा दाखवून तसेच उद्योग व व्यापार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ही मदत चिपळूण येथे रवाना करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शफिक खान, राष्ट्रवादी नेते काका कुडाळकर, बाळ कणयाळकर, भास्कर परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर देसाई, राजू धारपवार, प्रा. सचिन पाटकर, संतोष जोईल, सर्फराज नाईक, प्रतीक सावंत, नझिर शेख, आसिफ ख्वाजा कौस्तुभ नाईक आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 5 =