You are currently viewing कुडाळ भंगसाळ नदी येथील नगरपंचायत च्या ” गणेश घाटाचे ” नुकसान केल्याप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – राकेश कांदे(शहर अध्यक्ष भाजप)

कुडाळ भंगसाळ नदी येथील नगरपंचायत च्या ” गणेश घाटाचे ” नुकसान केल्याप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – राकेश कांदे(शहर अध्यक्ष भाजप)

आम. वैभव नाईक यांच्या सह अनेक नेत्यांनी रखडलेल्या बंधारा कामाची केली होती पहाणी

कुडाळ

शहरातील भंगसाळ नदीवर गेले काही वर्षे बंधारा बांधण्याचे काम रखडत – रखरड चालू होते .सदर काम रखडलेले असताना कुडाळ आणि पावशी ग्रामस्थांनी प्रयत्न केले होते आणि जाब ही विचारले होते .जिल्हयातील अनेक नेत्यांनी फोटोशेशन खुप वेळा केले होते .सदर काम करते वेळी संबंधित ठेकेदारांने गणेश घाटाचे नुकसान करून तोडफोड करून त्या ठिकाणा वरून अनेक वहाने बंधारा बांधण्याचे वेळी नदी ठिकाणी नेली सदर ठेकेदारांने अजून गणेश घाट सुस्थितीत केलेला नाही. तरी सदर ठेकेदारा कडून क्राँक्रीट चा गणेश घाट बांधून घ्यावा नसल्यास त्याचा खर्च वसूल करावा अन्यथा शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ नगरपंचायत चेमुख्याधिकारी यांच्या जवळ नगरसेवक तथा भाजपा शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − nine =