You are currently viewing मळेवाड ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट बेपत्ता…

मळेवाड ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट बेपत्ता…

मळेवाड ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट बेपत्ता…

सावंतवाडी

मळेवाड येथील ग्रामपंचायत सदस्य महेश रंगनाथ शिरसाट (वय ४४) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबतची खबर त्यांची पत्नी श्रद्धा हिने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. ८ तारखेला जेवण करून आपण कामानिमित्त सावंतवाडीला जातो असे सांगून निघून गेले. ते सायंकाळी आले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मावस दिराकडे आहे. १० मिनिटात घरी येतो, असे सांगितले. मात्र ते घरी पोहोचले नाहीत.
या काळात आंबोली तसेच कानूर, चंदगड या ठिकाणी नातेवाईकांकडून आपण त्यांची चौकशी केली. मात्र ते त्या ठिकाणी गेले नाही, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यानुसार याबाबत पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा