You are currently viewing काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्टच्या ज्येष्ठ सदस्या सावंतवाडी भंडारी मंडळाच्या जुन्या कार्यकर्त्या श्रीम.कल्याणी चौधरी बाई यांचे अल्प आजाराने निधन

काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्टच्या ज्येष्ठ सदस्या सावंतवाडी भंडारी मंडळाच्या जुन्या कार्यकर्त्या श्रीम.कल्याणी चौधरी बाई यांचे अल्प आजाराने निधन

मालवण :

 

सावंतवाडी काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्टच्या ज्येष्ठ सदस्या,आधारस्तंभ तथा सावंतवाडी भंडारी मंडळाच्या जुन्या जाणत्या धडाडीच्या कार्यकर्त्या कल्याणी चौधरी (वय ८०, रा.कोचरा, मालवण) यांचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री ८.०० वाजता कोचरा येथे निधन झाले. गेली अनेकवर्षं त्या सावंतवाडी येथे राहत होत्या. महिन्याभरापूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या सावंतवाडी येथून मूळ गावी कोचरा येथे राहण्यास गेल्या होत्या. त्या अविवाहित होत्या. सावंतवाडी येथील श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, माठेवाडा येथील अध्यात्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. श्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या त्या भक्त होत्या. काडसिद्धेश्वर मठ उभारणीतही त्यांचा मोलाचा सहभाग होता. मठाच्या आधारस्तंभ अशीच त्यांची ख्याती होती. समाजकार्याची अत्यंत आवड असलेल्या चौधरी बाईं सावंतवाडी भंडारी मंडळाच्या कार्यात हिरहिरीने भाग घ्यायच्या. गेली काही वर्षे वय साथ देत नसले तरी त्या काडसिद्धेश्वर मठातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागी व्हायच्या.

सावंतवाडी येथेच समाजकल्याण (महिला अंगणवाडी) खात्यात त्यांनी नोकरी केली होती. त्यांच्या निधनाने श्री.काडसिद्धेश्वर मठाचे तसेच भंडारी समाजाचे एक चांगली कार्यकर्ती गमावल्याचे दुःख आहे. श्री. काडसिद्धेश्वर मठ सावंतवाडीचे अध्यक्ष श्री परशुराम पटेकर यांनी चौधरी बाईंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

(टीप: कल्याणी चौधरी यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ठीक ९.३० वाजता कोचरा, मालवण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत).

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =