You are currently viewing इन्सुलीत ११ व १२ नोव्हेंबर रोजी श्री संत बाळूमामा पादुका दर्शन व भंडारा उत्सव

इन्सुलीत ११ व १२ नोव्हेंबर रोजी श्री संत बाळूमामा पादुका दर्शन व भंडारा उत्सव

बांदा

श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व नवदुर्गा कला क्रीडा मंडळ इन्सुली खामदेव नाका यांच्यातर्फे आयोजित संत बाळूमामा पादुका दर्शन व भंडारा उत्सव ११ व १२ नोव्हेंबर रोजी गणेश मंदिर खामदेव नाका येथे साजरा होत आहे. यानिमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार ११ रोजी सकाळी ९ वाजता संत श्री सोहिरोबानाथ स्वामी भेट व दर्शन होईल. ९.३० वा. इन्सुली दत्त मंदिर येथे संत बाळूमामांच्या पादुकांचे आगमन व पालखी सोहळा प्रारंभ होईल. सकाळी १०.३० वा. खामदेव नाका गणेश मंदिर येथे पालखीचे भव्यदिव्य स्वागत होईल. ११ वा. पादुकांचे पूजन, आरती, तीर्थप्रसाद व दर्शन सोहळा प्रारंभ होईल. दुपारी १.३० वा. महाप्रसाद, २.३० वा. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, ३ वा. इन्सुली महिलांची फुगडी होणार आहे.

सायंकाळी ४ वा. कुडाळ येथील किर्तनकार लक्ष्मण नेवाळकर यांचे श्री संत बाळूमामांच्या जीवन चरित्रावर किर्तन होईल. ६ वा. सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाज मंडळाच्या वतीने धनगरी नृत्य होईल. त्यानंतर भजनाचे कार्यक्रम होतील. शुक्रवार १२ रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, ७ वा. दर्शन सोहळा, ९ वा. वारकरी हरिपाठ, ११ वा. काल्याचे किर्तन व प्रवचन, १२ वा. दहिहंडी प्रसाद व त्यानंतर महाप्रसाद होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा