You are currently viewing गोव्यात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु..

गोव्यात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु..

महाराष्ट्र पाठोपाठ आता गोवा सरकारनेही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. गोव्यात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. गोव्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. तर गोव्यातील कसिनो, रेस्टॉरंट, बार, चित्रपट गृह 50 टक्के क्षमतेनं चालवली जाणार आहेत. तसे आदेश गोवा सरकारने दिले आहेत.

गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तसे संकेत दिले होते. त्यानंतर आज संध्याकाळी गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही राज्यात टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे, असं सावंत यांनी सांगितलं होतं.

गोव्यात मंगळवारी 1 हजार 160 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी 900 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 17 जणांचा मृत्यू झाला होता. गोव्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 8 हजार 240 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोव्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर कोरोना चाचणी केली जात आहे. त्यासाठी बांदा गावात आरोग्य यंत्रणेनं तयारी केली आहे. या ठिकाणी गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड टेस्ट केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 10 =