You are currently viewing मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने सावंतवाडी आगारप्रमुखांना घेराव…

मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने सावंतवाडी आगारप्रमुखांना घेराव…

मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने सावंतवाडी आगारप्रमुखांना घेराव…

सावंतवाडी

तालुक्यातील लांब पल्ल्याच्या गावातील गाड्या उशिराने सुटत असल्याने या गाड्यांनी जात असलेल्या शालेय मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते.

याबाबत मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आणि महीला विद्यार्थिनींनी उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, तालुकाध्यक्ष प्रतीक मालवणकर, माजी महिला विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष दिपाली राऊळ यांच्या समवेत सावंतवाडी आगारप्रमुखांना घेराव घालण्यात आला.
तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी तालुक्यातील शाळांमध्ये येत असतात. मात्र येथे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या नेहमीच उशिराने सुटत असतात. त्यामुळे येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. या होणाऱ्या गैरसोयीबाबत मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने आगारप्रमुखांना जाब विचारण्यात आला. यावर लवकरात लवकर तोडगा काढून सर्वाना चांगली सुविधा द्या अन्यथा लवकरच या विद्यार्थ्यांना आणि पालकांना घेऊन मनसेच्यावतीने आंदोलनाचा प्रवित्रा घेऊ, असा इशारा देण्यात आला. यावेळी दिपाली राऊळ, संध्या पाताडे, प्रणाली परब, रसिका धुरी, राजसानिया घाडी, दिशा आंगचेकर, निदा शेख, स्नेहा पाटील, सोनाली शेळके, शितल शेळके, समृद्धी सडेकर, साक्षी कुणकेरकर, रसिका पालव, अक्षता कोळाप्ते, दिक्षा उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 2 =