You are currently viewing देशहितासाठी काही विधायक निर्णय घेणे आज काळाची गरज –  श्रीकांत सावंत

देशहितासाठी काही विधायक निर्णय घेणे आज काळाची गरज – श्रीकांत सावंत

मसुरे / प्रतिनिधी :

देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे झालीत. अनेक राजकीय पक्षांची केंद्रात सरकारे आलीत व गेलीत परंतु देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचा हमीभाव, किंवा त्यांचे इतर प्रश्न, कामगारांचे अनेक प्रश्न, त्याच्या मागण्या, हक्क , देशातील सतत वाढत चाललेली बेरोजगारी, तसेच देशातील ढासळत चाललेली आरोग्य सेवा असेल, अनेक ठिकाणी वेळेवर आरोग्य केंद्रात, रुग्णालयात आवश्यक औषधेच उपलब्ध नसतात. कारण ए सी मध्ये बसून कारभार करणारे अधिकारी भ्रष्टाचाराने इतके निगरगष्ठ झाले आहेत की ठेकेदारांची बिले लाच मिळाल्या शिवाय पासच करीत नाहीत.हा अनुभव देशातील सर्वच क्षेत्रात चाललेला आहे. म्हणूनच देश हितासाठी काही विधायक निर्णय घेणे आता काळाची गरज बनली असल्याचे मत मानवता विकास परिषदचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.

अलीकडे ठाणे येथील काही दिवसातील अचानक मृत्यूचे उदाहरण समोर आहेच ,देशात महापूर सतत येऊन आता पर्यंत लाखो लोकांचे मृत्यू झालेत. लाखो कुटुंबे उध्वस्त झालीत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात काही राजकीय पक्षांची सरकारे अपयशी ठरली कारण योजना राबविण्यात भ्रष्टाचार कारणीभूत आहे. केंद्रासरकर, राज्यसरकार योजना जाहीर करतात परंतु त्या राबविण्यासाठी लागणारा निधी अनेक वर्षे उपलब्धच केला जात नाही. पेपरमध्ये, प्रसारमध्यमावर, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविन्यासाठी अनेक कोटी रुपयांचा खर्च केला जातो. योजनांचे भूमिपूजन, उदघाटन केले जाते. योजना पुढील निवडणुका येई पर्यंत फाईली मध्ये बंद असतात. केंद्रीय सरकारचया अहवालात नमूद केलेले आहे देशात दर वर्षी 3 ते 4 कोटी सुशिक्षित बेरोजगार युवक निर्माण होत आहेत. केंद्र सरकार व राज्यसरकार मधील अनेक विभागात लाखो पदे रिकामी आहेत. अनेक वर्षे ती पडे भरलीच गेली नाहीत. त्याचा परिणाम त्या त्या विभारतील सेवांवर होत आहे. 15 ते 20 हजार रुपयांच्या नोकरी साठी लाखो तरुणांचे अर्ज दाखल केले जातात, परीक्षा घेतली जाते, रिझल्ट लागतो. पास झालेल्या तरुणांना अनेक कारणांमुळे कित्येक वर्षे नोकरी मिळत नाही ही देशातील शोकांतिका आहे असा आरोप श्रीकांत सावंत यांनी पुढे केला आहे.
देशात आता पर्यंत लाखो जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. संघटित केंद्रीय व राज्य शासनातील कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करतात व आपल्या मागण्या मान्य करून घेतात. कारण त्यांच्याच सहकार्यानेच राजकीय नेते आपली पोळी भाजून घेतात. आता वेळ आली आहे त्यांच्या पगरवाढी कायमच्या बंद करून, नवीन लाखो पदांची निरनिळल्या विभागात देशभरात त्वरित भरती करून तरुणांना नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत. देशातील अशा अनेक विधायक प्रश्नांसाठी मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीना व सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की देशहितासाठी काही विधायक निर्णय त्वरीत घेण्यात यावे. त्यामुळे देशात शांतता निर्माण होईल भ्रष्टाचार निर्मुलन होईल व अनेक वर्षे बंद पडलेल्या चांगल्या योजना सुरू होतील व पूर्ण होतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − two =