You are currently viewing बॅ. नाथ पै करिअर अकॅडमी कुडाळ मध्ये “रहस्य उत्तुंग यशाचे”या विषयावर वसंत दाभोलकर यांचे व्याख्यान

बॅ. नाथ पै करिअर अकॅडमी कुडाळ मध्ये “रहस्य उत्तुंग यशाचे”या विषयावर वसंत दाभोलकर यांचे व्याख्यान

कुडाळ:

आय.ए.एस साठी निवड झालेल्या सिंधुदुर्ग पुत्र वसंत दाभोलकरचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला होता.

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे स्पर्धा करिअर घडवण्यासाठी बॅ.नाथ पै करियर अकॅडमी मार्फत विविध यशस्वी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या व मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. त्यामार्फत त्यांना मार्गदर्शन मिळवून दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून श्री वसंत दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाचे उद्या दिनांक 24 जून रोजी सकाळी दहा वाजता बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजन करण्यात आलेले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस) निवड झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र वसंत प्रसाद दाभोलकर यांचा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मानही केला आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावचे रहिवासी असलेले प्रसाद दाभोलकर यांचे चिरंजीव वसंत दाभोलकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. वसंत दाभोलकर यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले. श्री. दाभोलकर यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ला येथे व १२ वी पर्यंतचे शिक्षण कुडाळ येथे झाले. रत्नागिरीत फिनोलेक्स कॉलेजमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरीगंचे शिक्षण पूर्ण केले.

दिनांक २३ मे २०२३ रोजी त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली.  श्री. दाभोलकर यांचे वडील राज्य परिवहन महामंडळात (एस.टी) मध्ये लिपिक या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहे.

तरी स्पर्धा परीक्षां मार्फत आपलं करिअर करायला इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी व गरजूंनी सदर व्याख्यानाचा लाभ घ्यावा. असे  आवाहन बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व बॅ.नाथ पै अकॅडमीच्या समन्वयकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा