You are currently viewing आमदारांच्या वेतनात मासिक वाढ…

आमदारांच्या वेतनात मासिक वाढ…

सरकारकडून रिक्षा व्यावसायिक मात्र बेदखल: अविनाश पाटील

कुडाळ

कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या रिक्षा व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी कोणतीही मदत न करणाऱ्या सरकारने माजी आमदार आणि विद्यमान आमदारांच्या वेतनात 40000 रुपयांची मासिक वाढ करणारे विधेयक अवघ्या दोन मिनिटात पास करणारया सरकारला सर्वसामान्य लोकांची आणि आमच्यासारख्या हातावर पोट असणारया रिक्षा व्यवसाय करणारांची काय किंमत आहे हे
दाखवुन दिले, त्यामुळे या सरकारचा निषेध कराल तेवढा थोडाच आहे.  भाजप रिक्षा चालक मालक संघटना कुडाळ तालुका यांच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचे भाजप रिक्षा चालक मालक संघटना कुडाळ तालुका अध्यक्ष अविनाश पाटील यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − four =