You are currently viewing वामनराव महाडीक विद्यालयात ‘कृषीदिन’ साजरा

वामनराव महाडीक विद्यालयात ‘कृषीदिन’ साजरा

तळेरे हायस्कूलमध्ये वृक्ष लागवड करून ‘कृषीदिन’ साजरा

शेतकऱ्यांना एक दिवस मदत करून कृषीदिन साजरा करा – शरद वायंगणकर

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरे येथे विविध फळ झाडांची लागवड करून कृषी दिन साजरा करण्यात आला . शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांच्या हस्ते वृक्षारोपनाची सुरूवात करण्यात आली यावेळी माजी मुख्याध्यापक एस.जी नलगे , मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर , सी.व्ही.काटे, एन् .बी. तडवी , एन् .गावठे, ए.पी.कोकरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .


कृषीदिना निमित्त इयत्ता पाचवी ते बारावीमधील विद्यार्थ्यांनीं आणलेल्या आंबा, काजू , चिकू, पेरू, सीताफळ यासारख्या फळझाडांची विद्यालयाच्या परिसरात यावेळी लागवड करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांनी कृषी दिनाचे महत्त्व सांगितले तर शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांनी शेतकऱ्यांना भातशेतीमध्ये एक दिवस मदत करून ‘कृषीदिन’ साजरा करण्याचे आवाहन सर्वांना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =