You are currently viewing किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धुलाई…

किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धुलाई…

मुंबई :

 

गुरुवारी झालेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२० मधील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची किंग्स इलेव्हन पंजाब ने गोलंदाजी करून चांगलीच धुलाई केली. किंग्स इलेव्हन पंजाब चा कर्णधार लोकेश राहुलनं तडाखेदार शतकी खेळी करताना आरसीबी च्या गोलंदाजांची चांगलीच पळताभुई  केली. यावेळी लोकेश राहुल ने ६९ चेंडूंत १४ चौकार व ७ षटकार खेचून नाबाद १३२ धावा काढल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने ३ बाद २०६  धावांचा डोंगर रचला. याला उत्तर करताना आरसीबी चा संपूर्ण संघाला १७ षटकांत १०९ धावांत माघारी परतावे लागले.

 

त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबने  हा सामना ९७ धावांनी जिंकला. या सामन्यात विराट कोहली एक धाव करून माघारी परतला. त्यावेळी हिंदीत समालोचन करताना गावस्कर यांनी विराटच्या निराशाजनक कामगिरीवर म्हटले की, ”विराटनं लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला.”  त्यावरून माजी क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर यांनी केलेल्या कमेंटमुळे चाहत्यांनी नाराज व्यक्त केली आहे. गावस्कर यांनी या विधानात कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हीचा उल्लेख केल्या कारणावरून गावस्कर यांना समालोचकांच्या पॅनलवरून हटवण्याची मागणी होत आहे.

 

तर दुसरीकडे राहुलनं शानदार शतक साकारत आज अनेक विक्रम मोडीत काढले. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम राहुलच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. वॉर्नरनं २०१७ मध्ये हैदराबादचं नेतृत्त्व करताना १२६ धावांची खेळी साकारली होती. २०११ मध्ये विरेंद्र सेहवागनं दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना ११९ धावा केल्या होत्या. २०१६ मध्ये आरसीबीचं कर्णधारपद भूषवताना विराट कोहलीनं तीन शतकं (११९ धावा, १०९ धावा, १०८ धावा नाबाद) झळकावले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 7 =