You are currently viewing मोती तलावाच्या सांडव्यात कोसळलेल्या फळविक्रेत्याचे उपचारादरम्यान निधन..

मोती तलावाच्या सांडव्यात कोसळलेल्या फळविक्रेत्याचे उपचारादरम्यान निधन..

सावंतवाडी :

दोन आठवड्या पूर्वी चक्कर आल्यामुळे आठवडा बाजारात आलेला फळ विक्रेता थेट मोती तलावाच्या सांडव्यात कोसळून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून अखेर त्यांची रात्री प्राणज्योत मालवली. अब्दुल रझाक (५५) रा. माठेवाडा, असे त्यांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चिटणीस नाका परिसरात मोती तलावाच्या सांडव्याजवळ संबंधित विक्रेत्याने फळ विक्रीचा स्टॉल लावला होता. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते थेट सहा ते सात फूट खोल सांडव्यात कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

दरम्यान परिसरातील नागरिकांनी धावा-धाव करत त्यांना बाहेर काढले व उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णायात दाखल केले. तर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा- बांबूळी येथे हलविण्यात आले असता त्यांची प्राणज्योत मालवली. रजाक यांची परिस्थिती हालाखीची असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 6 =