You are currently viewing मुक्त विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत नावनोंदणीसाठी मुदवाढ

मुक्त विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत नावनोंदणीसाठी मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी मध्ये परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची  ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी दिली.

        प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी आणि उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परिक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज यापूर्वी दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत दिली होती. तथापि, पु:श्च बुधवार दि. 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळ आपली नावनोंदणी करण्यात यावी. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रासह अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर पर्यंत जमा करावे. संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादीसह सर्व अर्ज विभागीय मंडळाकडे सोमवार दि. 5 डिसेंबर पर्यंत जमा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =