You are currently viewing कवितेच्या जाऊ गावा

कवितेच्या जाऊ गावा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. अर्चना मायदेव यांची अप्रतिम काव्यरचना

कवितेच्या जाऊ गावा
शब्द रुपी नौकेतून
लेखणीचे करू वल्हे
जाऊ कविता होऊन.१

कवितेच्या गावी गाती
नद्या ,ओहोळ ,सरीता
भावनांची गाणी, ओव्या
बालगीत अन् कविता..२

कवितेच्या गावालाच
लाभे शब्दांचे कोंदण
प्रतिभेचे गुंफू धागे
होई कविता तोरण..३

कवितेच्या गावामधे
सद् विचारांचे पार
मात्रा उकारांचे पक्षी
कसे सजवी अक्षर..४

कवितेच्या जाऊ गावा
करू काव्य संमेलने
गाऊ आनंदे कविता
गीत, लावणी,भजने

कवितेच्या गावातच
झरे शब्दांचे चांदणे
बहरून गाव यावा
हेच देवास मागणे. ५

सौ. अर्चना मायदेव
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 12 =