You are currently viewing शोधतो मी वेदने आधार आता

शोधतो मी वेदने आधार आता

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी जयराम मोरे यांची अप्रतिम गझल रचना

बंद केले पापण्यांचे दार आता
शोधतो मी वेदने आधार आता

काय सांगू कालचा इतिहास माझा
आपले जर मांडती व्यापार आता

सौख्य होते लाभलेले काल परवा
पावसाने मोडला संसार आता

दाटला अंधार मोठ्या संकटाचा
विठ्ठला बा तूच रे परिहार आता

आजही गोंजारतो जखमा जुन्या मी
सोसण्या ते दुःख मी कसदार आता

*जयराम मोरे सोनगीर*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − nine =