You are currently viewing पावसाने

पावसाने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री श्रीमती अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*पावसाने*

आज अवचित कहर केला
*पावसाने…….*
सूर्य ही झाकोळला
त्या *पावसाने….*.
लगबगीने चालली ती एकटी
भिजवला जरीकाठ सारा
*पावसाने…..*
बरसले फांदीतूनी हे थेंब मोठे
पंख भिजले पाखरांचे
*पावसाने……..*
गढुळल्या पाण्यात नावा कागदी
वाहूनी नेल्या कशा मग
*पावसाने……..*
जाहला कापूस शेतीत गच्च ओला
कोंब आले बीजवईतून
*पावसाने….*…
वेदनेचा दाह दाटे अंतरात
आसवांना पूर आला
*पावसाने…….*
निथळले आभाळ सारे या भुईवर
स्वच्छ पुन्हा नभ उजळले
*पावसाने………..!*

***********************
*अरूणा दुद्दलवार*

प्रतिक्रिया व्यक्त करा