You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात आज कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ…

सावंतवाडी तालुक्यात आज कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ…

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ आज पडवे माजगाव येथे करण्यात आला. बांदा मंडळ अंतर्गत डेगवे सजा यांच्यावतीने महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी येथील जयवंत लक्ष्मण दळवी व भिवसेन नारायण देसाई यांच्या शेतावर काजू बागेची आखणी व वृक्ष लागवड तालुका कृषि अधिकारी प्रमोद बनकर, सरपंच लक्ष्मण गवस यांचे हस्ते करण्यात आली. तसेच रासायनिक खतामध्ये १० टक्के बचत करणेसाठी जुन्या काजू झाडांना ग्लिरिसिडीयाचा पाला कुजवून नत्र खताचा पुरवठा करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी सन २०२१-२२ मधील आत्माराम रामचंद्र गवस यांच्या काजू बागेस भेट देऊन झाडांना आकार देणे, खत व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर व बांदा मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, कृषी पर्यवेक्षक अजमुद्दीन सरगुरू, कृषी सहाय्यक श्री. गाड, श्रीम. देसाई, श्रीम वसकर, श्रीम. बेळगुंदकर, कृषी सहायक अतुल माळी, पोलीस पाटील अरविंद देसाई, कृषी मित्र सचिन देसाई, उदय देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =