You are currently viewing खाजगी बस प्रवासी वाहतुकीला 100 टक्के परवानगी….

खाजगी बस प्रवासी वाहतुकीला 100 टक्के परवानगी….

मुंबई :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या अनेक सेवा आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत सुरू केल्या जात आहे. यापूर्वी खासगी वाहतुकदारांना एसटी प्रमाणेच 50 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी होती. त्यानंतर आता, एसटी प्रमाणेच राज्यातील खासगी वाहतुकदारांना सुद्धा 100 टक्के प्रवासाची परवानगी देण्यात आली असून, प्रवासी वाहतुकीदरम्यान कोविड 19 च्या नियमांचे तंतोतंत पालन सुद्धा करावे लागणार आहे.

राज्य सरकारने एसटीला 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर खासगी वाहतुकदारांनी ही 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची मागणी करण्यात आली होती.
यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी राज्य शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर आता खासगी वाहतुकीलाही 100 टक्के प्रवासी वाहतूक करता येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.
दरम्यान खासगी वाहतुकदारांना कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने तसेच परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. यामध्ये बसच्या प्रत्येक फेरीअंती बसची स्वच्छता ठेवणे व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक. मास्क घातला नसेल तर प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवणे आवश्यक. बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी अतिरिक्त मास्क ठेवावे लागणार असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + eleven =