You are currently viewing कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनाच सरसकट मोफत देणे चुकीचे..

कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनाच सरसकट मोफत देणे चुकीचे..

जिवन रक्षा वैदयकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी
सध्या देशात व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना संसर्गाची लस मोफत देण्याचे कार्य चालू असल्याने ही लस फक्त गोरगरीब दारिद्र रेषेखालील जनतेला व केशरी रेशनकार्ड धारक ज्यांचे उत्पन्न ४५००० हजार पर्यंत आहे तसेच ज्या रेशन कार्ड धारकांना रेशन मोफत मिळते त्याचप्रमाणे पिवळे,अंत्योदय व अन्नपूर्णा या रेशन कार्डधारकांना व त्यांच्या कुटुंबियांना ही लस मोफत देण्यात यावी,उर्वरित जनतेला ही खाजगीरित्या रुग्णालयात तसेच मेडिकल स्टोअर, फॅमिली डॉक्टरच्या मार्फत ही लस पैसे देऊन घेतल्यास परदेशांतून ही लस खरेदी केल्यास आता जी होणारी शासकीय रुग्णालयात गर्दी चे प्रमाण कमी होऊ शकते. व लवकरच कोरोना महामारीची साथ आटोक्यात येऊ शकते. लस सरसकट सर्वांनाच मोफत देणे फार चुकीचे असून यामध्ये सरकारने हजारो कोटी रुपये वाया जाऊन खरोखरच ज्या गोरगरीब रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, विविध प्रकारच्या औषध उपचारासाठी हे राहिलेले पैसे सरकारने वापरले तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळू शकतो. अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 3 =