You are currently viewing गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकाराच्या प्रसारासाठी प्रयत्न करावेत –  उमेश झिरपे

गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकाराच्या प्रसारासाठी प्रयत्न करावेत –  उमेश झिरपे

वैभववाडी

गिर्यारोहण हा छंद नसून एक साहसी क्रीडा प्रकार आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्यावतीने तसेच जिल्हा गिर्यारोहण संघटनांनी गिर्यारोहण या क्रीडा प्रकाराच्या प्रसारासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष श्री.उमेश झिरपे यांनी केले.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी स्वरूपसेवा संस्थेच्या मधुरांगण प्रकल्पामध्ये मौजे खाटपेवाडी, भूकूम, ता. मुळशी, पुणे येथे संपन्न झाली.


यावेळी व्यासपीठावर अ.म.गि.म.संघाचे सचिव श्री. राजन बागवे, कार्याध्यक्ष श्री.ऋषिकेश यादव, खजिनदार श्री. मंगेश चौधरी व श्री. गिरिश टकले उपस्थित होते.
मागील दोन वर्षाच्या कोरोना काळामध्ये महासंघ आणि जिल्हा संघटनांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली.
अ.म.गि.महासंघाशी संलग्नित महाराष्ट्रातील अनेक जिल्हा संघटनांची स्थापना करण्यात आले आहे. या जिल्हा संघटनांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये गिर्यारोहण आणि गिर्यारोहण संबंधित उपक्रमांना चालना देण्यात येईल असे उमेश झिरपे यांनी सांगितले.या सभेला महासंघाचे ६६ सदस्य उपस्थित होते. यामध्ये महासंघाचे पदाधिकारी, महासंघाच्या सदस्य संस्थांचे अधिकृत प्रतिनिधी आणि जिल्हा संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांचा समावेश होता. सभेच्या विषय पत्रिकेवर सर्वांनी खुप चांगल्या प्रकारे चर्चा करून काही महत्त्वाचे
निर्णय घेण्यात आले.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये गिर्यारोहणासंबंधीत काम करणाऱ्या विविध नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा संघटनेचे सभासदत्व स्वीकारून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्नित होऊन गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याचे ठरले.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर व सचिव प्रा.श्री.एस.एन.
पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत महासंघाचे सचिव श्री.राजन बागवे यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. ऋषीकेश यादव यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =