You are currently viewing कळलेच नाही

कळलेच नाही

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

आठवांच्या त्या खुणाना विसरू पहाती आंसवें
भेटीतले क्षण अमृताचे उरले कसे कळलेच नाही

रागातही अनुराग छळतो सांगू कशी तुज राजसा
विरहात जन्मे मिलनाची रे ओढ हे कळलेच नाही

दोन दिवसांचा अबोला ओठास जरीही मानवेना
बोला विना रुसवा सरे ओठास हे कळलेच नाही

स्पर्श बोटांचा बटेतुन कधी गलांवरी जी ओघळे
आठवे पण कां पुन्हा ती गाली रुळे कळलेच नाही

लाज पांघरलीच होती पण पहिले हसतांना तुला
या कुशी्हून त्या कुशी वळले कधी कळलेच नाही

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 15 =