You are currently viewing चयन

चयन

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमरानी यांची काव्यरचना

काट्याच्या फांदीवरती
रक्तफुले बोलत होती
दु: ख झुल्याचे झेलत
काट्यासवे झुलत होती

फुलपाखरु रुतले
निवडुंगी झुडपात
फडफडत पंखात
अंगाई बोले रात

नागफणी खोटे काढी
पाल्याची सळसळ
येता झोका वा-याचा
काटेफांदी सोसे कळ

बगळ्याचे चूकले थवे
आसमंती फिरतात
चांदण झेलत झेलत
फेसाटी झुडुपी शिरतात

खळखळ झरा पाण्यात
खेकडे सेना फळतांना
भयभीत मासे कल्लोळी
रातकिडे चीत्कार राना

पायवाटा फसवतांना
हसतात इवले गवत
रानगाय चरतां चरता
गावताचे करते रवत

रक्तफुले सोसता सोसता
टिपकते रक्ताश्रू नयन
शल्य ह्दयी झेलत झेलत
जीवनाचे नसे हाती चयन

©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा