You are currently viewing “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन!”

“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन!”*

 

महामानव भिमरायां करू वंदन
लोकोद्धारासाठी त्यांनी वेचिले जीवन।।धृ।।

बुद्ध धर्म स्वीकारून आदर्श जीवन
चळवळीने करती जनजागरण
वंचितांना विश्वास राहे मिळे सन्मान।।1।।

संस्कृती सांभाळती आदरच राखून
द्रष्टे अन्याय्य रूढींचा बिमोड करून
सार्वभौम बंधुत्व जपण्या शिकवण।।2।।

भारताची लोकशाही केली बलवान
प्रसंगात”घटना”करी मार्गदर्शन
विश्वात भारतीय घटनेचा सन्मान।।3।।

गरिबांचे दुःख जाणती आसू पुसून
शिक्षणाची महती सर्वांना पटवून
अन्याया विरुद्ध करती भीम गर्जन।।4।।

लेखणी वाणी तेज असे सूर्या समान
मिळाले त्यांना मरणोत्तर भारतरत्न
त्यांचे विचार सदा प्रेरणा स्फूर्ती पूर्ण।।5।।

काव्य: श्री अरुण गांगल कर्जत रायगड.महाराष्ट.
पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा