You are currently viewing शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास व नुतनीकरणा मुदतवाढ

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास व नुतनीकरणा मुदतवाढ

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास व नुतनीकरणा मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

सन 2021-22 करिता महाडिबीटी प्रणालीवर भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करणेकरिता शासनाने अनु. जाती इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवगासाठी 15 जून 2022 अखेर मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, समाज कल्याण विभागाचे आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे.

ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून 2022 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ भरावेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे वर्ग करण्यात यावित व शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करणेबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय  दूरध्वनी क्र. 02362 228882 येथे संपर्क साधावा,असे आवाहन दीपक घाटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =