You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार

श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.जी एम शिरोडकर, प्रा. जी टी यादव ,भौतीकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डी एन पाटील, वनस्पतीशास्त्र प्रयोगशाळा परिचर श्री .एम डी पवार हे आपल्या नियत वयोमानानुसार महाविद्यालयातील प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ .शुभदादेवी भोंसले, संस्थेचे संंचालक प्रा. डी टी देसाई ,
सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल तसेच या कार्यक्रमासाठी सौ. शिरोडकर, सौ यादव ,सौ पाटील ,सौ पवार महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त केले व आपल्या अनुभवाचा फायदा येथील विद्यार्थ्यांना मिळावा असे मत व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल.भारमल यांनी केले. त्यांनी निवृत्त होणाऱ्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी व कर्मचारयानी अतिशय प्रामाणिक सेवा केली असे सांगितले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रा. डाॅ. यू एल देठे ,प्रा. एस एल वैरागे, प्रा. डाॅ.बी एन हिरामणी,प्रा. डी डी गोडकर, प्रा. डाॅ. सौ. पी जी नाईक,प्रा.डाॅ .बी एन हिरामणी, प्रा.व्ही.पी सोनाळकर, प्रा. डाॅ वाय.ए चौधरी, प्रा. डाॅ.एस ए देशमुख , श्री ज्ञानेश्वर तळकटकर आदींनी निवृत्त होणारे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बद्दल आपल्या भावांना व्यक्त केल्या व त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी काही वाद्यार्थ्यानीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. यु सी पाटील यांनी केले व आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =