You are currently viewing मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने “अलर्ट” रहावे…

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने “अलर्ट” रहावे…

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने “अलर्ट” रहावे…

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; आपत्कालीन परिस्थिती नियोजना संदर्भात बैठक…

सिंधुदुर्गनगरी

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्कालिन परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अलर्ट रहावे, असे आवाहन आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी येथे आयोजित केलेल्या बैठकीत केले. दरम्यान यासाठी आवश्यक असलेल्या उपायोजना तसेच साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यासंदर्भातच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, आदी उपस्थित होते.

यावेळी रस्त्यांवर झाड पडल्यास ते झाड त्वरित बाजूला करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे, तसेच अशा रस्त्यांवरची धोकादायक झाडे/ फांद्या मान्सून कालावधीपूर्वी बाजूला करण्यात याव्यात, मान्सूनपूर्व कालावधीत महामार्गाच्या दुतर्फा साईड पट्टी, मातीचा भराव टाकावा, राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक व अपघातप्रवण जागांची निवड व या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाईची कामे त्वरित हाती घेण्यात यावीत व पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करावीत, नगरपालिका अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी करून घेण्यात यावी, पावसाळा कालावधीत नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होईल याबाबत दक्षता घेण्यात यावीत, मान्सून कालावधीत नगरपालिका क्षेत्र स्वच्छ राहील याची दक्षता घेण्यात यावी, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी, पावसाळा कालावधीतील साथीच्या आजाराचे नियंत्रण करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती तालुक्यास उद्भवल्यास करावयाच्या नियोजनाबाबत विचारविनिमय करावा आदी सूचना करण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा