You are currently viewing महामार्ग चौपदरीकरणाचा टोल वसुली करण्यास आमदार नितेश राणे यांचा विरोध

महामार्ग चौपदरीकरणाचा टोल वसुली करण्यास आमदार नितेश राणे यांचा विरोध

आधी चौपदरीकरणाची कामे पूर्ण करा,प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न निकाली काढा

ओसरगाव येथे टोल सुरू करण्यावरून अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी दिला इशारा

कणकवली

महामार्ग चौपदरीकरण आता प्रकल्पग्रस्त असलेल्या जनतेचे प्रश्न प्रथम सोडवा. त्यांची नुकसान भरपाई आधी द्या व महामार्ग चौपदरीकरणाची अर्धवट राहिलेली जी कामे आहेत ती प्रथम पूर्ण करा आणि मगच टोलवसुलीचा निर्णय घ्या. तोपर्यंत टोल वसुली करण्यास आमचा विरोध असेल. असा इशारा भारतीय जनता पार्टीचे कणकवली देवगड वैभववाडी चा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे चौपदरीकरणाचा टोल सुरू केला जाणार आहे. अशी माहिती प्राप्त झाली आहे. मात्र महामार्गाची असंख्य कामे अद्यापही सुरू आहेत.अनेक कामे अपूर्ण आहेत. महामार्ग चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.अनेक प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.अनेकांचे निवाडे प्रलंबित आहेत,असे असतांना टोल वसुली सुरू केली जात असेल तर त्याला आमचा विरोध राहील.अशा स्पष्ट शब्दात एका व्हिडिओद्वारे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी बजावले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा