You are currently viewing मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमाराचा मृत्यू

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमाराचा मृत्यू

मालवण

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बाळकृष्ण विठोबा परब (वय ५२ रा. सर्जेकोट मिर्याबांद) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली. याबाबत शिवदास परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्जेकोट येथील बाळकृष्ण परब हे मासेमारीसाठी नौकेतून समुद्रात गेले असता अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. नौकेवर असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मालवण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा