You are currently viewing महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत

*महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.*

*ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची राज्य आयोगाकडे मागणी.*

वैभववाडी

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले होते. मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व आयोगातील बायोमेट्रिक मशीन अचानक बंद झालेले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी व कामकाजाची वेळ यांची पडताळणी करता येत नाही व पारदर्शकताही राहत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील बायोमेट्रिक मशिन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेसह राज्यातील जिल्हा शाखांच्यावतीने राज्य आयोगाचे अध्यक्ष मा. एस.पी.तावडे यांच्याकडे मेल व पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातील सर्व ग्राहक आयोगात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे आहे. कामकाज सुरळीतपणे सुरू आहे.कामात पारदर्शकता आहे. तसेच ग्राहक आयोगात काम करणारे अधिकारी कर्मचारी ग्राहक वकील व इतर मंडळी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक आयोगात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे असे आम्हास वाटते.
सबब आमच्या उपरोक्त दोन्ही मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा व तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणीवजा विनंती केली आहे.
काही वर्षांपूर्वी प्रत्येक मंचात /आयोगात बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले होते. या कामावर शासनाने लाखो रुपये खर्च केलेले होते. मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व मशीन बंद पाडण्यात आली किंवा बंद पडलेली आहेत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांची नुकसान झालेले आहे. सबब नवीन बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसल्यानंतर ते बंद पडणार नाही. याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व प्रबंधक यांच्यावर टाकण्यात यावी अशी मागणीवजा विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रा.श्री. एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केली आहे.

संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा