You are currently viewing सामाजिक बांधिलकीतून दिव्यांगांना कलाशिक्षण

सामाजिक बांधिलकीतून दिव्यांगांना कलाशिक्षण

*सामाजिक बांधिलकीतून दिव्यांगांना कलाशिक्षण*

*’एमआयटी एडीटी’चा अनिकेत सेवाभावी संस्थेत स्तुत्य उपक्रम*

पुणे-

एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाचे स्कुल ऑफ फाइन व अप्लाइड आर्ट्स (सोफा), राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस), विद्यार्थी कल्याण विभाग आणि स्कुल ऑफ होलेस्टिक डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने अनिकेत सेवाभावी संस्था, पुणे येथे ‘कला शिक्षणाद्वारे शैक्षणिक परिवर्तन’ या चार दिवसीय स्तुत्य उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
प्रा. शीलकुमार कुंभार आणि प्रा. उत्तम जनवाडे यांच्या मार्गदर्शना तंर्गत या उपक्रमात एमआयटी सोफाच्या विद्यार्थ्यांसह अनिकेत सेवाभावी संस्थेतील 55 विशेष दिव्यांग मुलांचाही उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला, याद्वारे त्यांनी संस्थेच्या आवारात जीवंत भित्तीचित्रे तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम केले. या उपक्रमाचा उद्देश अनिकेत सेवाभावी संस्थेचे सुशोभिकरण करणे, तसेच या भित्तीचित्रांच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा होता. या उपक्रमाने केवळ कलात्मक अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही तर दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक एकात्मता आणि सक्षमीकरणाचे महत्व देखील अधोरेखित केले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी अनिकेत सेवाभावी संस्थेच्या उपक्रमाच्या व्यापक परिणामांवर भाष्य केले आणि विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रयत्नांचे देखील कौतुक केले. याप्रसंगी बोलताना, एमआयटी सोफाचे प्राचार्य व अधिष्ठाता डॉ. मिलिंद ढोबळे म्हणाले की, हा उपक्रम कलेच्या पलीकडे जावून प्रत्येक व्यक्तीच्या अद्वितीय क्षमतांना समजून घेवून जोडण्याचे काम करतो. समाजबांधीलकी जपत आमचे विद्यार्थी करत असलेले कार्य निश्चितचा आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
उपक्रमा दरम्यान उपस्थित विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुराज भोयर यांनी विद्यार्थ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी, अनिकेत सेवाभावी संस्थेच्या मुलांसोबत वाटून घेतलेला आनंदाचा अनुभव किती हृदयस्पर्शी होता ते अधोरेखित केली.

*सहानुभूती व परस्पर आदराचा संगम*
अनिकेत सेवाभावी संस्थेच्या भिंतींना सजवणारी भित्तीचित्रे एकता, सर्जनशीलता आणि कलेच्या परिवर्तनीय शक्तीचे प्रतीक आहेत. एमआयटी-सोफा मधील सहभागी विद्यार्थी आणि अनिकेत सेवाभावी संस्थेच्या मुलांनी केवळ कलाच निर्माण केली नाही तर त्यांनी सहानुभूती आणि परस्पर आदराचा संगम घडवून आणला आहे. या यशस्वी उपक्रमाला अनिकेत संस्थेच्या संचालिका कल्पना वर्पे आणि ट्रस्टी राजश्री जंगले, सुहास जंगले, गणेश तनपुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

*संवाद मीडिया*

*त्वरा करा… त्वरा करा…..*🏬

*काही मोजकेच फ्लॅट शिल्लक*🏬

*_🏬फक्त चौदा लाखात सावंतवाडी-भटवाडी येथे फ्लॅट…!🏠_*

*🏬नक्षत्र अपार्टमेंट🏠*
*🏠सावंतवाडी🏬*

*ऐतिहासीक भटवाडी तळीच्या शेजारी🌴 दत्त आणि विठ्ठल मंदीर🛕 समोर बसस्थानकापासून १ किलोमीटरच्या 🚍 आत रेडी पझेशन👍 आणि सर्व परवानग्या📃 सहीत फ्लॅट उपलब्ध…!*

*⛳टीप:-* *आंबोली-सावंतवाडी रोड टच, उपरलकर देवस्थानाच्या पुढे, ५ गुंठे प्लॉट विकणे आहे…!*

*♻️प्रोप्रा. पनवेलकर डेव्हलपर्स♻️*
*सावंतवाडी*

*📲संपर्क:-*
*9422436585*
*9766048585*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/135837/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा