You are currently viewing सुवर्णकारांनी व्यवसायातील आव्हानांवर विजय मिळवावा – अनिल चोडणकर

सुवर्णकारांनी व्यवसायातील आव्हानांवर विजय मिळवावा – अनिल चोडणकर

बांद्यात संत नरहरि सोनार पुण्यतिथी उत्साहात…

बांदा

आज सुवर्णकार क्षेत्रात नव-नवी व्यावसायिक आव्हाने येत आहेत. परप्रांतिय कारागिरांगिरांचे या क्षेत्रात प्रमाण वाढत आहे. स्थानिक सुवर्णकारांनी आपली कला, कारागिरी वृद्धींगत करणे गरजेचे आहे. गोमंत कालिका हे मासिक आपले हक्काचे व्यासपीठ आहे.सुवर्णकारांनी एकसंघ राहून व्यवसायातील आव्हानांवर विजय मिळवावा असे प्रतिपादन गोमंत कालिका मासिकाचे सहाय्यक संपादक अनिल चोडणकर यांनी बांदा येथे केले.

बांदा दैवज्ञ समाजाच्या वतीने संत श्री नरहरि सोनार पुण्यतिथी तसेच मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांचा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. बांदा ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात आयोजित या सोहऴ्याच्या अध्यक्षस्थानावरुन चोडणकर बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर गोमंत कालिकाचे सेक्रेटरी सुभाष लोटलीकर, खजिनदार संजीव नावेकर,सदस्य सर्वेश रायकर, बांदा दैवज्ञ समाज नुतन कार्यकारीणी अध्यक्ष सुरेश चिंदरकर, उपाध्यक्ष संतोष चिंदरकर, खजीनदार राजाराम धारगळकर, सेक्रेटरी प्रसाद चिंदरकर, महिला अध्यक्ष धनश्री धारगळकर, उपाध्यक्ष पूजा चिंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. उद् घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.यावेळी संत नरहरि सोनार आणि नाना शंकऱशेठ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.

आरंभी दिवंगत ज्ञातीबांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सोहऴ्याच्या निमित्ताने य़ावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, हॅण्डलूम साडी विक्री उद्योजिका पूजा तेंडले , संत नरहरी सोनार महाराज हाती छायाचित्र रेखटणारा यश चोडणकर,गुळदुवे ग्रामपंचायत सदस्य गणपत मोहन कारेकर, सिव्हिल इंजिनियर पदवीप्राप्त संजय चोडणकर तसेच अध्यक्ष अनिल चोडणकर, श्री. लोटलीकर,श्री. रायकर, श्री.नागवेकर यांचा सत्कार करण्यात आला.सुवर्णकार समाजातील अनेक गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला.तसेच संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्यावर पिएचडी केलेल्या डॉ. भक्ती महाजन आळवे यांचा गौरव करण्यात आला. भक्ती यांच्या वतीने वडील गिरीश महाजन यांनी हा सत्कार स्विकारला. यावेळी गिरीश महाजन यांनी दैवज्ञ समाजाची युवा कीर्तनकार आर्या साळगांवकर हीेचे विशेष कौतुक करत पुष्पगुच्छ गौरव केला.

यावेळी संजय चोडणकर यांनी संत नरहरी सोनार यांचा जीवन चरित्रपट कथन केला.नुतन अध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी मनोगतात सांगितले की सर्व दैवज्ञ समाजबांधवांना एकत्र घेऊन ज्ञातीबांधवांच्या हीतासाठी प्रयत्न करणार.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन हनुमंत मालवणकर यांनी केले. सत्कारमुर्ती परिचय मंगलदास साळगांवकर यांनी तर आभारप्रदर्शन अक्षता साईराज साळगांवकर यांनी केले.या सोहळ्याला सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा