You are currently viewing कणकवलीत १४ मे पासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता….

कणकवलीत १४ मे पासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता….

नगराध्यक्ष समीर नलवडे यांच्याशी पालकमंत्री सामंत यांची चर्चा

व्यापाऱ्यांसोबत नगराध्यक्ष यांनी घेतली तातडीची बैठक

तोपर्यत मिळणार घरपोच सेवा

कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले तरी, त्याची प्रभावी अंमलबजावणी कणकवलीतील जनता व व्यापाऱ्यांनी अगोदर आठ दिवसापासूनच जनता कर्फ्यूच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे कणकवलीला या लॉकडाऊनमध्ये सवलत द्यावी अशी मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे, विरोधी नगरसेवक आणि व्यापाऱ्यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्ह्यासाठी एकाच वेळी लॉकडाऊन जाहीर झाले तरी, कणकवलीने पूर्वी ८ दिवसापासून प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे व कणकवलीतील व्यापारी व जनतेकरिता दिलासा म्हणून कणकवलीत १४ मेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्याशी बोलताना दिली.दरम्यान याकाळात किरणामाल,भाजी घरपोच केले जाणार आहे.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याबाबत तातडीने आज दुपारी बैठक घेत विरोधी नगरसेवक व व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे, विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा पदाधिकारी महेश नर्वेकर, राजू गवाणकर, राजेश पारकर, सुशील पारकर, राजेश राजाध्यक्ष, शेखर गणपत्ये, विशाल कामत आदी उपस्थित होते. या बैठकीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जिल्हा लॉकडाउन करत असल्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी कणकवलीबाबत चर्चा करण्यात आली. त्यांना कणकवलीत यापूर्वीच जनता कर्फ्यूच्या माध्यमातून बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांचे देखील याबाबत लक्ष वेधण्यात आले असे संगितले. मात्र, यावर नगरसेवक कन्हैया पारकर यांनी कणकवली तालुक्याने यापूर्वीपासूनच लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्याने कणकवली शहरासह तालुक्याला यातून वगळा व तालुक्याच्या सीमा लॉक करा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करूया असे सांगितले. प्रशासनाच्या माध्यमातून जे लॉकडाऊन आता जाहीर करण्यात येणार त्याची अंमलबजावणी कणकवलीने अगोदरच केली. यासंदर्भात तहसीलदार व प्रांताधिकारी यांना पत्र द्या अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली. राजेश राज्याध्यक्ष यांनी नगरपंचायतमार्फत आवाहन केल्यानंतर आम्ही कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्यासाठी सहकार्याची भूमिका घेत जनता कर्फ्यू मध्ये सहभागी झालो. आता प्रशासनाचं लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने जर लॉकडाऊन जाहीर केलं व त्यानंतर पुन्हा केंद्र सरकार मार्फत जाहीर झाल तर व्यापाऱ्यांनी करायचे काय? असा सवाल त्यांनी केला. या संदर्भात पालकमंत्री सर्व आमदार यांच्याशी व्यापारी संघटनेने चर्चा करा अशी सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. तर याबाबत सुशांत नाईक यांनी तातडीने आमदार वैभव नाईक यांची याप्रश्नी लक्ष वेधत व्यापाऱ्यांची भूमिका मांडली. व नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा करत व्यापार्‍यांच्या प्रश्नांबाबत लक्ष वेधले. त्यानंतर तातडीने या संदर्भात दोन्ही आमदारांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी थेट नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून व्यापाऱ्यांची भूमिका जाणून घेतली. त्यावर पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार, मात्र कणकवलीने जे अगोदर आठ दिवस लॉकडाऊन पाळलं त्यामुळे कणकवलीतील दुकानदार व नागरिकांना दिलासा देण्यासाठी १३ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हा १४ मे पासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी नलावडे यांना दिली. मात्र, यावर राजन पारकर यांनी नगराध्यक्षांशी चर्चा करताना कणकवलीने अगोदर आठ दिवस कडक जनता कर्फ्यू पाळला असल्याने निदान १३ मे रोजी पासून दुकाने सुरू करण्यास मान्यता द्या अशी मागणी केली. यावर कन्हैया पारकर यांनी आपण सर्वांनी एकत्र येत एक ठाम भूमिका घेऊ व यासाठी प्रशासन वर दबाव आणूया अशी सूचना केली. मात्र, जर लॉकडाऊनचे पालन केले नाही व कारवाई झाली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल व्यापाऱ्यांनी करत अखेर १४ मे पासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्याच्या मागणीवर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले व तसा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांना सांगण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 14 =