You are currently viewing जी-पॅट 2022 परीक्षेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे दैदीप्यमान यश

जी-पॅट 2022 परीक्षेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे दैदीप्यमान यश

नागेश कलशेट्टी देशात 67 वा

सावंतवाडी

औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जी-पॅट 2022 परीक्षेत येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

कॉलेजचा विद्यार्थी नागेश कलशेट्टी याने 239 गुणांसह ऑल इंडिया रँकिंगमध्ये 67 वा क्रमांक प्राप्त करत कॉलेजच्या प्रतिष्ठेत मानाचा तुरा खोवला. त्यासोबतच कॉलेजच्या इतर बारा विद्यार्थ्यांनीही यशस्वीपणे ही परीक्षा उत्तीर्ण होत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. यामध्ये गौरव कविटकर 203, नेहा मयेकर 176, पुरुषोत्तम काळोजी 172, तेजस कोंडविलकर 145, कल्पेश गिरप 145, मोहिनी तावडे 141, तृप्ती मोरजकर 139, ऐश्वर्या कोचरेकर 136, अनुश्री कुडतरकर 132, निखिल सांगेलकर 98, अल्केश मंचेकर 94 व संगीत खोकले 87 गुण यांचा समावेश आहे.

जीपॅट परीक्षेच्या सरावासाठी महाविद्यालयाने स्वतंत्र मार्गदर्शन तासिका घेऊन विद्यार्थ्यांना सहकार्य केले होते. वर्षभर घेतलेल्या विशेष तासिका तसेच परीक्षा, अभ्यासाचे नियोजन व विद्यार्थ्यांची मेहनत या मुळेच सलग तिसऱ्या वर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादित केल्याचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सांगितले. जीपॅट परीक्षा एप्रिल महिन्यात संपूर्ण भारतात विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

या परीक्षेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना देशातील उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळावा हा आहे. जीपॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेलया विद्यार्थ्यांना गुणवत्ते आधारे औषधर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम. फार्मसीला) प्रवेश दिला जातो. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीदेखील मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या._

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =