You are currently viewing कणकवलीत अपूर्व उत्साहात शोभा यात्रेने केले हिंदू नववर्षाचे स्वागत..!

कणकवलीत अपूर्व उत्साहात शोभा यात्रेने केले हिंदू नववर्षाचे स्वागत..!

कणकवलीत अपूर्व उत्साहात शोभा यात्रेने केले हिंदू नववर्षाचे स्वागत..!

पारंपारिक वेशभूषेत स्त्री-पुरुषांनी घेतला उस्फूर्त सहभाग,

भाजप आमदार नितेश राणे झाले होते सहभागी

कणकवली :

गुढीपाडव्याचे औचित्य साधून हिंदू नववर्ष स्वागतयात्रा कणकवली शहरातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. मंगळवारी गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी प्रति वर्षाप्रमाणे कणकवली शहरातून स्वागतयात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या स्वागत यात्रेमुळे कनकनगरी दुमदुमून गेली होती. या नववर्ष स्वागत यात्रेतील राम लक्ष्मण सीता चित्ररथ लक्षवेधी ठरले. महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते. हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काढलेल्या या स्वागत यात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आला. कणकवली शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी झालेल्या या शोभा यात्रेतील सिंधु गर्जना ढोल पथकाने परिसर दणाणून गेला होता. पारंपारिक वेशातील स्त्री, पुरूष आणि भगवे ध्वज, चित्ररथ, श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी, गोंधळी समाजाच्या लोकनृत्य देखावा, दुचाकीला भगवे झेंडे लावून पारंपारिक वेशामध्ये सहभागी झालेल्या महिला भगिनींचा उत्साह द्विगुणीत झालेला पहावयास मिळाला. दरम्यान हिंदू वर्ष स्वागत यात्रेनिमित्त कणकवली शहर भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु झालेली शोभायात्रा आप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठमार्गे विद्यामंदिराच्या पटांगणावर पोहचली. शिवारा मंदिराजवळ शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला. या यात्रेत आ. नीतेश राणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच, भाजप युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, मेघा गांगण,सुप्रिया नलावडे, राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, संजय कामतेकर, संजय मालंडकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर, दादा कोरडे, सुशील पारकर, नंदकुमार आरोलकर, सुनील सावंत, वैजयंती करंदीकर, मृणाल ठाकूर, दत्तप्रसाद ठाकूर, प्रतिभा करंबेळकर, हरीश गणपते, संदीप राणे, सत्यविजय जाधव, समर्थ राणे, श्रीधर मुसळे, सूर्यकांत मालवणकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा