You are currently viewing राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) सुनील लिमये उद्या दोडामार्गात

राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) सुनील लिमये उद्या दोडामार्गात

हत्तीबाधीत केर, मोर्ले गावांना भेटी आणि शेतकऱ्यांशी संवाद

दोडामार्ग –

राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) सुनील लिमये हे उद्या शनिवार दिनांक 28 मे रोजी तिलारी खोऱ्यात येत असून रानटी हत्ती बाधित गावांना भेटी देणार आहेत. केर, मोर्ले आदीं हत्तींचा वावर असलेल्या गावांत जाऊन हत्तींचा संचार, उपाययोजनांची तसेच हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. शिवाय ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचा एक कळप मुक्तपणे फिरतो आहे. अगदी सायंकाळच्या सुमारास या कळपाचे केर गावात पणावठ्या जवळ दर्शन झाले. तर मोर्ले गावात हत्ती थेट भर वस्तीत शिरले. अनेकांच्या अंगणापर्यन्त हत्ती पोहचले. त्यामुळे आसपासच्या गावात हत्तींची दहशत पसरली आहे. दररोज अनेकांच्या शेती – बागायतींना उध्वस्त करणाऱ्या या हत्तींचा बंदोबस्त करण्यात कमी पडत असल्याच्या कारणावरून हत्तीबधीत गावांनी स्थानिक वनकर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. केर येथे हत्ती प्रश्नावरून जागर आंदोलनही छेडण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये हे तिलारी खोऱ्यातील हत्तीबाधित गावात उद्या शनिवारी येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा